हास्यकविता

हास्यकविता

लोखंडाचे टक्कल!

शिरस्त्राण (हेल्मेट) सक्तीनं ग्रासलेल्या समस्त पुणेकरांना सादर सविनय समर्पण!

सुपीक कोणा डोक्यामधली
सुपीकशी ही शक्कल
हरेक माथ्यावरती चढले
लोखंडाचे टक्कल!

(या आधी काय होतं!)
भुरभुरणारे केस कुणाचे
सळसळणाऱ्या लांब बटा
कभिन्न काळे केस कुणाचे
कुणा मस्तकी रंग छटा
(आता काय झालं)
दिसे न काही अता यातले
हरेक डोके असे झाकले!
हरेक डोके अता वाटते
एक-दुज्याची नक्कल!!
हरेक माथ्यावरती चढले
लोखंडाचे टक्कल!

Average: 8.4 (11 votes)

घरामधे तू ससा

सिंह जरी तू जगतासाठी
घरामधे तू ससा
हीच कहाणी तुझी मानवा
हाय असा तू कसा!

तुझ्या आरोळ्या डरकाळ्यांनी
दुमदुमते तारांगण
तुझी कर्तबे पाहुन होते
अचंबित तारांगण
घरात येता कशास होतो
तुझा कोरडा घसा!!
हीच कहाणी तुझी मानवा
हाय असा तू कसा!

Average: 8.5 (39 votes)

पसारा... पसारा...

कसा आज काव्यास यावा फुलोरा
सखे भोवताली, पसारा... पसारा...!

इथे ढीग आहे, तिथे ढीग आहे
जिथे पाहतो मी तिथे ढीग आहे
ढिगारे बघोनी मनाला शहारा
सखे भोवताली, पसारा... पसारा...

Average: 6.9 (15 votes)

कोण म्हणतं आमच्या घरात

कोण म्हणतं आमच्या घरात
माझं काही चालत नाही?
गरम पाणी मिळाल्याशिवाय
मी भांड्यांना हात लावत नाही!

Average: 9 (957 votes)

दुपार

तुडुंब जेवण झाल्यावरती
ग्लानी यावी अपार
निवांत लोळत गादीवरती
जावी पुरी दुपार!

खिडक्यांवरती पडदे ओढुन,
गरगरणारा पंखा लावुन
अंगावरती ओढुन चादर,
सदैव व्हावे तयार...
निवांत लोळत गादीवरती
जावी पुरी दुपार

हापिसात दमछाक तुम्हाला
करायची तर करा
बोनस टोनस इंक्रिमेंटने
खिसे आपले भरा
आम्हास आमुचा आळस प्यारा
तुम्ही काय ते हुषार...
निवांत लोळत गादीवरती
जावी पुरी दुपार

Average: 5.8 (24 votes)

बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह १

माझ्या हास्य कविता, विनोदी कविता, हजला आणि हलक्या फुलक्या कवितांचा संग्रह. बहुसंख्य हास्यकविता २००२ ते २००६ ह्या कालावधीमध्ये लिहिलेल्या आहेत. काही कविता मायबोली, मनोगत इत्यादी संकेतस्थळांवर प्रकाशित झालेल्या आहेत आणि "आनंदाचं गांव" कार्यक्रमात सादर करत आलो आहे.

Average: 8.3 (192 votes)