अमेची पुन्हा रात आली गटारी
अम्हा पाहुनी धुंद झाली गटारी
कुणी एक प्याला, कुणी 'पिंप'वाला
भरे बेवड्यांच्या पखाली गटारी
कुणी झिंगलेला, कुणी संपलेला
पुसेना कुणाची खुशाली गटारी
फिरे आज जो तो घमेंडीत ऐसा
करी बावळ्यांना मवाली गटारी
अमीरांस लाभे, गरीबांस लाभे
वसे दुःखितांच्या महाली गटारी
सर्व 'झिंग'रसिकांना गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!