आपण किराणामालाच्या दुकानात उभे असतो, मुलानी कुठलीशी दुधात घालायची पावडर आणि बायकोनी कुठलासा लै भारीवाला शांपू आणायला सांगितलेला असतो. या दोन्हीच्या रेग्युलर पॅक्सवरच्या किंमती बघून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असते.
तुम्हाला कडकडून भूक लागलेली असते. समोरच्या ताटात वाफाळता भात अन त्यावर गरमागरम वरण येतं. बाजूला एक लिंबाची फोड आणि आंब्याचं लोणचं असतं. भातावर ते लिंबू पिळतानाचा त्याच्या सालीचा जाड-आंबट स्पर्श… भात कालवताना बोटांना बसलेले चटके… एका बोटानं लोणच्याचा खार भाताला लावताना बोटाला लोणच्याचा झालेला तिखट स्पर्श… मग तो घास घेताना ओठांना, दातांना, जिभेला झालेला गरमा गमर तिखट खारट गोडचट सुखद स्पर्श….
दोन मोठे आणि मुख्य कप्पे असतात आयुष्यात. कामाचा कप्पा आणि कुटुंबाचा कप्पा. कामाच्या कप्प्यात ऑफिस, करियर, सहकारी, कॉम्पिटीशन असं काय काय असतं.. कुटुंबाच्या कप्प्यात आपला जोडीदार, मुलंबाळं, आई-वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, घरदार, गाड्या-घोडे वगैरे असतं!
संग तसा नेहमीचा, बायकोसोबत साडी खरेदीला गेल्याचा!
"ही लिंबू-पारवा कॉम्बिनेशनची साडी कशी वाटतिये?" बायकोनी विचारलं...
"लिंबू... आणि पारवा...? हे रंग आहेत...?" माझा प्रश्न...
"बरं, ही जाऊ दे... ती श्रीखंडी कशी आहे?"... बायकोचा प्रतिप्रश्न...
"श्रीखंडी?... नको... चिकट असेल..." मी उगाच विनोद मारायचा प्रयत्न केला...