विडंबन

विडंबन

तू चष्मा सांभाळ

चाल: फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार

गळक्या नाकावरती आहे चष्मा तो नाठाळ
गाढवा तू चष्मा सांभाळ

हाती तुझीया स्र्माल नाही
पदर कुणाचा जवळही नाही
नाक सारखे गळतच राही
घे स्र्माल अन नाक तुझे रे पूस आता तू बाळ
तू चष्मा सांभाळ, गाढवा तू चष्मा सांभाळ

Average: 6.6 (10 votes)

तू तेंव्हा जोशी

चाल: तू तेंव्हा तशी

तू तेंव्हा जोशी
तू आत्ता जोशी
तू खरी आहेस जोशांची

एक चहा साधा
मला नाही दिला
तू पक्की आहेस पुण्याची
तू तेंव्हा जोशी
तू आत्ता जोशी

साडी तुझी जुनी चोळी तुझी जुनी
तुला नाही ओढ नव्याची
तू तेंव्हा जोशी
तू आत्ता जोशी

Average: 8 (14 votes)

शतदा प्रेम करावे

चाल: या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

या चिवड्यावर, या भेळीवर
शतदा प्रेम करावे

रगडा पुरी, पाणी पुरी
इच्छा झाली पूरी
दाबेलीच्या पावामधुनी
फिरते माझी सुरी
पुरी टम्मशी बघुन कुणाचे
फुगरे गाल स्मरावे

Average: 8.4 (42 votes)

सखी बैल आला मारका

चाल: सखी मंद झाल्या तारका

सखी बैल आला मारका
आता तरी पळशील का? पळशील का?

ती गाय तेथे देखणी
आली तशी गेली गुणी
तो बैल बघतच राहिला
त्या गवत तू देशील का?

गोठ्यातल्या चार्‍याहुनी
हे गवत आहे चांगले
म्हणुनी उरे काही उणे
तू पूर्तता करशील का?

Average: 8.5 (12 votes)

नाच रे चोरा - विडंबन संग्रह १

नाच रे चोरा हा माझा ऑनलाईन विडंबन संग्रह. या संग्रहामधे काही प्रस्थापित लोकप्रिय गाण्यांची मी केलेली विडंबनं संग्रहित केली आहेत. यातील बहुतांशी विडंबनं ही 2002 ते 2004 या दरम्यान लिहिलेली आणि मायबोली.कॉम वर प्रकाशित झालेली आहेत. शिवय यातली काही विडंबनं ही लोकांनी कॉपी-पेस्ट करून ईमेलद्वारे मुक्‍तपणे वाटलेलीही आहेत.

Average: 7.5 (24 votes)