गूढचलनांचं भविष्य काय?
व्यवहार हा मानवी जीवनाचा स्थायिभाव आहे. दहा हजार वर्षांपूर्वी शेतीमध्ये आलेला माणूस, “माझ्या शेतातली थोडी ज्वारी तुला घे आणि बदल्यात तुझ्याकडचा थोडा तांदूळ मला दे” म्हणून व्यवहार करायला लागला. एकमेकांवर आणि व्यवहारांवर अवलंबून असलेलं आयुष्य जगायला लागला. मग कधीतरी वस्तूविनिमय करण्याऐवजी कोण्या राजानं छापलेली सोन्या-चांदीची नाणी व्यवहारासाठी वापरायला लागला. अन मग पुढे सोन्या-चांदीच्या नाण्यांऐवजी सरकारी सहीचे कागदाचे तुकडेही वापरायला लागला, वापरतो आहे अजूनही. अगदी अलिकडच्या डिजिटल युगात, कागदाच्या तुकड्यांऐवजी व्हर्चुअल पैसाही आला.