कार्यक्रमाची माहिती

'ऋतु गझलांचा', मराठी गझल मुशायरा - डोंबिवली

डोंबिवली येथील काव्यरसिक मंडळ या कवितेला वाहिलेल्या संस्थेचे ४२ वे वार्षिक स्नेहसंमेलन दि १६-१७ फेब्रुवारी रोजी आंबेडकर हॉल,नगरपालिका इमारत,डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न होत आहे.

या निमित्ताने रविवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता 'ऋतु गझलांचा' हा मराठी गझलांचा मुशायरा आयोजीत केला आहे. यात वैभव जोशी, चित्तरंजन सुरेश भट, प्रसाद शिरगावकर, प्रमोद खराडे, संदीप माळवी व संमेलनाध्यक्ष श्री. इलाही जमादार गझला सादर करणार आहेत.

लंडनच्या कार्यक्रमाची झलक!

महाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवात झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगाची एक छोटिशी झलक!

लंडनमध्ये आनंदाचं गांव!

महाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये 'आनंदाचं गांव ' हा माझ्या कवितांच्या कार्यक्रम सादर करायची संधी मला मिळाली आहे! कार्यक्रमाचा तपशील असा:

आनंदाचं गांव...
हलक्या फुलक्या कवितांची आगळी वेगळी मैफील...

ई-सकाळवर "कुणीतरी आठवण काढतंय"!

कुणीतरी आठवण काढतंय च्या नुकत्याच झालेल्या मैफलीची बातमी आणि क्षणचित्राचा व्होडिओ ई सकाळवर प्रसिध्द झाला आहे:

बातमी : http://www.esakal.com/esakal/04222007/Pune7B13E88927.htm

व्हिडिओ:
http://www.esakal.com/features/athwan/in

आनंदाचं गांव - कळवा, ठाणे येथे

ब्राम्हणसभा कळवा (ठाणे) यांच्या नवरात्रोत्सवामध्ये 'आनंदाचं गांव' हा माझा कवितांचा कार्यक्रम सादर करण्याची संधी मला मिळालेली आहे. कार्यक्रमाचा तपशील असा:

दिवस: शनिवार, दिनांक २३ सप्टेंबर
वेळ: रात्री ९.३० वाजता
कार्यक्रमाचा अवधी: सुमारे १ तास सलग

Subscribe to कार्यक्रमाची माहिती