वीस वर्षांमध्ये दहा-बारा देशांमधल्या पंचवीस-तीस शहरांमध्ये हिंडलेल्या एका भटक्याची ही डायरी आहे! हे ‘प्रवासवर्णना’चं पुस्तक नाही. कुठल्या देशात, कुठल्या शहरात गेलात तर तिथे काय काय बघायचं, त्याचं ऐतिहासिक-सामाजिक महत्व काय वगैरेचं वर्णन या पुस्तकात नाही. तसंच मी कुठे गेलो, तिथे काय काय प्रेक्षणीय स्थळं पाहिली, ती बघताना कशी धावपळ झाली याचंही वर्णन या पुस्तकात नाही. ही डायरी हे प्रवासवर्णन नाही तर प्रवासचिंतन आहे.
कामानिमित्त जगभर हिंडत असताना घडलेले प्रसंग, आलेले अनुभव आणि ते अनुभवत असताना किंवा नंतर मनात आलेले विचार यांची अक्षरशः रोजिनीशी किंवा डायरी आहे. अर्थात, ही डायरी असली तरी ती तारीख-वारानुसार मांडलेली नाही. वीस वर्षांच्या भटकंतीच्या काळातली साठ-सत्तर डायरीची पानं एकत्र करून समोर ठेवली आहेत.
लिंक
प्रकाशन वर्ष
पुस्तक प्रकार