पूजेची तयारी
गणपती पूजनासाठी खालील साहित्य हवे
गणपती मूर्ती, कापूर, एक श्रीफळ, पुष्पमाळा, फुले व हार, दूर्वा, उदबत्तीचा एक पुडा, अत्तराची लहान बाटली, जानवे, एक डझन विड्याची पाने, कापसाची वस्त्र किंवा उपवस्त्र, चंदन पावडर, गुलाल, हळद, कुंकू, शेंदूर, सुपारी (१२), फळे: केळी, चिकू, सफरचंद.
घरात असू शकणारी सामग्री
- पाण्यासाठी तांब्या, देवासाठी पाट, चौरंग, स्वतः बसण्यासाठी आसन
- तीन नग दिवे: १. मोठा पूजा सुरु करताना, २. छोटा पूजेच्या मध्यात, ३. मध्यम आरतीसाठी
- दोन पराती: १. देवाला स्नान घालण्यासाठी. २. पूजन सामग्री ठेवण्यासाठी
- तीन थाळी: नैवेद्य व पुष्पमाळा ठेवण्यासाठी
- हात धुण्यासाठी दोन ताम्हणे
- तीन पात्रे: १. पळी, २. ताम्हण, ३. भांडे
- हात पुसण्यासाठी फडके
- देवाचे अंग पुसण्यासाठी फडके
- कापसाच्या वाती
- चार लहान वाट्या
- चंदन
घरून किंवा बाजारातून आणावी लागणारी सामग्री
- कच्चे दूध, दही, शुद्ध तूप, साखर, मध 50 ग्रॅम, अक्षता
- गणेश पूजनासाठी पत्री (सध्या बाजारात गणेश पत्रींची पॅकेट्स उपलब्ध असतात)
- तीन किंवा पाच अग्रे असलेली दुर्वा
- मोदक
- विविध प्रकारची फुले
गणेश पूजनासाठी निषिद्ध वस्तू
- तुळशी किंवा तुळशीचे पान गणपतीला अर्पण करत नाहीत.
- गणपतीला एकच प्रदक्षिणा घाला.
- घरात दोनपेक्षा अधिक मूर्ती नको.
- गणपतीची जुनी किंवा तुटलेली मूर्ती ठेवू नका.
- अपूर्ण दुर्वा अर्पण करू नये
सूचना
- पूजेसाठी एखादी वस्तू उपलब्ध नसल्यास अक्षता वाहाव्यात.
- गणेशमूर्ती विसर्जनाची सोय नसेल, तर घरातील (शोकेस) मूर्ती काढून स्वच्छ धुऊन प्रतिष्ठापनेसाठी घ्यावी
- उत्तरपूजेनंतर, विसर्जनाच्या अक्षता वाहिल्यानंतर ही मूर्ती परत जागेवर ठेवता येईल गणेश चतुर्थीच्या अगोदर आठ दिवस या मूर्तीला पूजेत स्थान द्यावे.
रोजची पूजा व आरती
(Click the Red Play button or Listen in Browser link in the Player above)
घरात गणपती बसलेले असण्याच्या कालावधीत दररोज सकाळ-संध्याकाळ श्रींची नियमित पूजा अशाप्रकारे करावी
निर्माल्य
श्रींना आधी वाहिलेली फुले इत्यादी काढून निर्माल्यामध्ये जमा
पूजा
श्रींना उपलब्धतेनुसार हळद कुंकू फुले दुर्वा इत्यादी अर्पण करून घरातील सर्वांनी मनोभावे नमस्कार करावा
नैवेद्य
श्रींना गुळखोबरे पंचखाद्य आदींचा नेवेद्य दाखवावा
आरती
धूप दीप कापूर प्रज्वलित करून श्रींची आरती म्हणावी. आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी श्रींना नमस्कार करावा
उत्तरपूजा
हा ऑडियो फक्त विसर्जनाच्या दिवशी उत्तरपूजा करतानाच वापरावा
(Click the Red Play button or Listen in Browser link in the Player above)
श्री गणेशाची उत्तरपूजा करण्यासाठीच्या सूचना आणि मंत्रोच्चार.
संशोधन व मंत्रपठण: डॉ. संजय उपाध्ये
आपल्या घरातील प्रथेनुसार गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, श्री गणेशाच्या पार्थीव मूर्तीचे विसर्जन करण्याआधी ही पूजा करावी.
आमच्याविषयी
गणेशपूजा ॲप हे ॲप प्रसाद शिरगावकर यांच्या मराठी वेबसाईट्स डॉट कॉम ह्या कंपनीच्या टीमने २०१२ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित केले होते. तेंव्हा अँड्रॉइड आणि iOS साठी असलेल्या हे ॲपची प्रसाद शिरगावकर यांनी २०२० मध्ये वेब ॲपच्या रुपामध्ये पुनर्निर्मिती केली.
डॉ.संजय उपाध्ये
डॉक्टर उपाध्ये हे ज्येष्ठ प्रवचनकार व्याख्याते लेखक व कवी आहेत. ज्ञानेश्वरी व गीता या ग्रंथांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. या ग्रंथांच्या अभ्यासावर आधारित प्रबंधावर त्यांना डॉक्टरेट (पीएचडी) मिळालेली आहे. गप्पाष्टक या त्यांच्या एकपात्री कार्यक्रमाचे सुमारे दीड हजार प्रयोग जगभरातील अकरा देशांमध्ये झालेले आहेत. या ॲप मधील पूजांचे पौरोहित्य व निरूपण डॉक्टर उपाध्ये यांनी केलेले आहे
प्रसाद शिरगावकर
प्रसाद शिरगावकर हे मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत. तीन पुस्तके, पाच मोबाइल दिवाळी अंक आणि अनेक वेबसाइट्सची निर्मिती त्यांनी केली आहे.