अगदी ताजं लिखाण

तुझी नजर...

असे जहालसे जहर तुझी नजर
मनात निर्मिते कहर तुझी नजर!

कितीक टाळलेस शब्द तू तरी
हळूच देतसे खबर तुझी नजर

प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले

प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले
प्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले

बाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे
प्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले

'बजेट' ची गझल!

तसेच ते खुळे ठराव वाचतो बजेटमधे
सदैव वाढतात भाव, पाहतो बजेटमधे

अजून राहिलेत द्यायचे जुनेच कर तरी

मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले

मूळ कविता : मेघ नसता वीज नसता
मूळ कवी : संदीप खरे

मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले
जाहले रस्ते नवे तेथे उकरणे चालले!

(रस्ता रोडरोलरला म्हणतो)
जाडसर चाकावरी का काळसरसा लेप हा?
तू मला ’रोलून’ बघताना तुला मी पाहिले!

एवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा?
मुंगळेही डांबरावर भार वाटू लागले

नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी

नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी
जो तुम्हाला भेटला तो देव म्हटला शेटजी!

एक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी
अन तिथे तुमच्यामुळे बाजार भरला शेटजी...

'ऋतु गझलांचा', मराठी गझल मुशायरा - डोंबिवली

डोंबिवली येथील काव्यरसिक मंडळ या कवितेला वाहिलेल्या संस्थेचे ४२ वे वार्षिक स्नेहसंमेलन दि १६-१७ फेब्रुवारी रोजी आंबेडकर हॉल,नगरपालिका इमारत,डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न होत आहे.

या निमित्ताने रविवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता 'ऋतु गझलांचा' हा मराठी गझलांचा मुशायरा आयोजीत केला आहे. यात वैभव जोशी, चित्तरंजन सुरेश भट, प्रसाद शिरगावकर, प्रमोद खराडे, संदीप माळवी व संमेलनाध्यक्ष श्री. इलाही जमादार गझला सादर करणार आहेत.

गुंड लोकांचे...

भक्त झाले लोक सगळे गुंड लोकांचे
भोवताली भव्य पुतळे गुंड लोकांचे

रोजची चतकोर पत्रे सभ्य लोकांची
अन पहा हे भव्य मथळे गुंड लोकांचे!

लंडनच्या कार्यक्रमाची झलक!

महाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवात झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगाची एक छोटिशी झलक!

पाऊस जोराचा... आकांताचा...

वेळ रात्रीची... एकांताची
पाऊस जोराचा... आकांताचा...

खिडकीच्या काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब
घरात जरी येत नसले
तरी हृदयात खोलवर शिरत रहातात
आणि
घराबाहेरचे वादळवारे आता
मनातही वेगानं फिरत रहातात

लंडनमध्ये आनंदाचं गांव!

महाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये 'आनंदाचं गांव ' हा माझ्या कवितांच्या कार्यक्रम सादर करायची संधी मला मिळाली आहे! कार्यक्रमाचा तपशील असा:

आनंदाचं गांव...
हलक्या फुलक्या कवितांची आगळी वेगळी मैफील...

बापुजींची ईमेल...

पंधरा ऑगस्टला ईमेल्स बघण्याची
कुठून कळेना बुध्दी झाली...
माझ्या इनबॉक्स मधे आज
बापुजींची ईमेल आली!

sender चं नाव ओळखीचं नव्हतं
वाटलं, कदाचित spam असेल...
नंतर वाटलं, बापुजींच्या नावानी
कशाला कोण spamming करेल!

बापुजींनी लिहिलं होतं...

बेटा, साठ वर्षातली तुमची प्रगती पाहून

सोबत असले... नसले कोणी...

मैफलीत या बसले कोणी
हसले कोणी, रुसले कोणी...

म्हणे भेटण्या झुंबड झाली
मला कसे ना दिसले कोणी?

तिचे नि माझे नाते अभंग होते!

भांडण तंटे हे तर तरंग होते
तिचे नि माझे नाते अभंग होते!

एक दुज्यांची काटछाट करताना
शब्दशाप हे हळवे पतंग होते

ई-सकाळवर "कुणीतरी आठवण काढतंय"!

कुणीतरी आठवण काढतंय च्या नुकत्याच झालेल्या मैफलीची बातमी आणि क्षणचित्राचा व्होडिओ ई सकाळवर प्रसिध्द झाला आहे:

बातमी : http://www.esakal.com/esakal/04222007/Pune7B13E88927.htm

व्हिडिओ:
http://www.esakal.com/features/athwan/in

प्रेमाचा रिंगटोन (Video)

कुणीतरी आठवण काढतंय या कार्यक्रमामधील एक कविता...

येथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल

'कुणीतरी आठवण काढतंय' या कार्यक्रमाची माहिती आपल्याला येथे मिळू शकेल

दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट! (Video)

नुकत्याच झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगात सादर केलेलं हे विडंबन!

येथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल

ऋतू येत होते, ऋतू जात होते

ऋतू येत होते, ऋतू जात होते
कधी खिन्न होते, कधी गात होते!

किनारे सुखाचे कुणाला मिळाले?
कितीसे खलाशी समुद्रात होते...

भास आहे सर्वकाही...

भास आहे सर्वकाही...
जीवनाला अर्थ नाही

तो म्हणे सर्वत्र आहे
(भेट नाही एकदाही...)

सुंदर तरुणी दिसल्यावर...

कळे न मजला इतके भीषण काय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही
तशी बायको सोबत माझी होती तरिही
नकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन
तिला केशरी बासुंदीची साय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

साधंसोपं वर महाराष्ट्र टाईम्स मध्ये लेख!

महाराष्ट्र टाईम्स च्या मुंबई आवृत्ती मध्ये दिनांक ३० जानेवारी रोजी साधं-सोपं.कॊम वर लेख प्रकाशित झाला.

आमच्यातर्फे महाराष्ट्र टाईम्स व नील वेबर यांचे मन:पूर्वक आभार!

sadhasopa

तुला सांगतो भगवंता...

तुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये
तुला चेहरा माझा दिसतो, मला तुझा का दिसू नये!

वस्त्र नागडे तेजाचे घे, वा दुलई अंधाराची
तेज-तमाच्या सीमेवरती जिवास उसवत बसू नये!

आपल्या दोघांमधे ही गॅप का?

आपल्या दोघांमधे ही गॅप का?
ऐकतो मी लावण्या, तू रॅप का?

राहतो राणी तुझ्या हृदयात मी
शोधते आहेस गूगल-मॅप का!

वेदनांची मांडतो आरास मी

भासतो त्यांना सुखाचा दास मी
वेदनांची मांडतो आरास मी!

पाहतो ते ते खरे मी मानतो
केवढे जपतो उराशी भास मी...

आजकाल मी मनातल्या मनात बोलतो!

काय वाटते मला कशास कोण ऐकतो?
आजकाल मी मनातल्या मनात बोलतो!

रंग वेदनांस देत राहतो नवे नवे
शेवटी मनात मी सुखेच सर्व रेखतो

ती जाताना 'येते' म्हणून गेली

ती जाताना 'येते' म्हणून गेली
अन जगण्याचे कारण बनून गेली!

म्हटली मजला 'मनात काही नाही'
पण जाताना मागे बघून गेली!

पाने