अगदी ताजं लिखाण

सुडोकू

रिते हे रकाने भरावे कसे?
सुखाचे सुडोकू सुटावे कसे?

इथे हा असा अन तिथे तो तसा
कुठे कोण हे ओळखावे कसे?

सीने मे जलन - भावानुवाद

आग हृदयी, वादळे डोळ्यांत का?
माणसे या गावची गुंत्यात का?

पाहिले माझ्यात ऐसे काय हे?
आरसा पाहुन मज प्रश्नात का?

शिल्पकार

झेलावयास माझी छाती तयार आता
घाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता

दूर किती...

सखये तू राहतेस दूर किती...
इकडे मी पोहतोय पूर किती...

सगळे दिधले तुलाच अंतरंग
उसने आणू अजून नूर किती?

साधं सोपं आयुष्य

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

आनंदाचं गांव - कळवा, ठाणे येथे

ब्राम्हणसभा कळवा (ठाणे) यांच्या नवरात्रोत्सवामध्ये 'आनंदाचं गांव' हा माझा कवितांचा कार्यक्रम सादर करण्याची संधी मला मिळालेली आहे. कार्यक्रमाचा तपशील असा:

दिवस: शनिवार, दिनांक २३ सप्टेंबर
वेळ: रात्री ९.३० वाजता
कार्यक्रमाचा अवधी: सुमारे १ तास सलग

आभार

हे संकेतस्थळ तयार करण्यामधे ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग आहे अशा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

तंत्रज्ञान
हे संकेतस्थळ द्रुपल (Drupal) ही मुक्‍तस्रोत प्रणाली वापरून तयार केलेले आहे. द्रुपल ही मुख्य प्रणाली (Core Drupal) आणि त्यासाठीच्या अनेक घटक प्रणाल्या (Modules) तयार करून त्या मुक्‍तपणे वाटणार्‍या शेकडो तज्ञांचे आभार!

मूर्खता - एक अभ्यास!

आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक मूर्ख माणसं भेटत असतात. घरामध्ये, रस्त्यावर, ऑफीसात, बसमध्ये, स्टेशनवर, सरकारी कचेरीत, मित्रांच्या कट्ट्यावर... जिथे जाऊ तिथे वेगवेगळ्या रूपातले मूर्ख त्यांच्यातल्या मूर्खतेसह आपल्या समोर येत रहातात. त्यांच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला भरपूर त्रास होत असतो. आपण नेमकं काय केलं, कसं वागलं तर हा त्रास कमी होईल याची आपल्याला कधीच टोटल लागत नसते.

माझ्या विषयी थोडंसं...

खरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही! तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो!

आनंदाचं गांव - कवितांची आगळी वेगळी मैफील!

आनंदाचं गांव? ही काय भानगड आहे?
तुमच्या माझ्या आयुष्यात आनंदाचं गांव निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या आयुष्यातले खड्डे चुकवत चुकवत आपल्याला आनंदाच्या गावापर्यंत नेऊ शकणार्‍या रस्त्याचा हा शोध आहे.

ह्या... काहीतरी काय...

पाने