गंभीर

रिक्त सुरई

रामायणात सीता भूमीत गुप्त झाली
जाशील तू कुठे गं, भूमीच लुप्त झाली

आता पराभवांची काहीच बोच नाही
पाहून रक्त माझे चंडी प्रतप्त झाली

बगीचा

छेडला हा सूर कोणी बासरीचा?
स्पंदला का राग माझ्या अंतरीचा?

आज मी गाउ सखे गाणे कशाला
मैफ़लीचा नूर नाही नेहमीचा

दाह

भलतेच काहि आज मी बोलून गेलो
सर्व काहि सत्य मी सांगून गेलो

तारका ती आजही आलीच नाही
आवसेने मी पुन्हा गांजून गेलो

स्पंद...

सत्य हृदयातील या सांगायचे आहे कुठे?
गीत माझ्या अंतरीचे गायचे आहे कुठे?

शोधतो आहे जरी मी मार्ग वेड्यासारखे
हे कधी कळलेच नाही जायचे आहे कुठे?

तेजवेडा जीव

मी कधी शुध्दीत होतो? नेहमी धुंदीत होतो!
ऐकले नाही कुणाचे माझिया मस्तीत होतो!

दाटतो सार्‍या दिशांना होउनी मी मेघ काळे
मी सदा माझ्याचसठी पावसाची प्रीत होतो

राजवाड्यांची कधी मी कौतुके केलीच नाही
आजही मातीत आहे, नेहमी मातीत होतो

सुडोकू

रिते हे रकाने भरावे कसे?
सुखाचे सुडोकू सुटावे कसे?

इथे हा असा अन तिथे तो तसा
कुठे कोण हे ओळखावे कसे?

सीने मे जलन - भावानुवाद

आग हृदयी, वादळे डोळ्यांत का?
माणसे या गावची गुंत्यात का?

पाहिले माझ्यात ऐसे काय हे?
आरसा पाहुन मज प्रश्नात का?

दूर किती...

सखये तू राहतेस दूर किती...
इकडे मी पोहतोय पूर किती...

सगळे दिधले तुलाच अंतरंग
उसने आणू अजून नूर किती?

पाने

Subscribe to गंभीर