विनोदी

उडून आली माशी

चाल : घर आजा परदेसी तेरा देस बुलाये रे

कुठून आली कळले नाही
कुठे निघाली कळले नाही
काहीच कळण्या आधी माशी उडून गेली रे
उडून आली माशी आणि उडून गेली रे

वरण इतके गार असुनी

चाल: तरुण आहे रात्र अजुनी

वरण इतके गार असुनी
भात तू खाल्लास का रे?
ओरपूनी भात सगळा
हात तू धुतलास का रे?
भात तू खाल्लास का रे?

गेलो सासूच्या माहेरी

चाल: माझे माहेर पंढरी...

गेलो सासूच्या माहेरी
केल्या सगळ्यांच्या तक्रारी

बाप आणि आई
मज छळती ठाई ठाई
मज छळती ठाई ठाई

दिवस असे की

चाल: दिवस असे की कोणी माझा नाही

दिवस असे की
दात घासले नाही
अन अंघोळ केली नाही

चांदण्यात घोरताना

चाल: चांदण्यात फिरताना माझा धरलास हात

चांदण्यात घोरताना मोठा येतो आवाज
तरी आहे सावरतो, आवरतो मी आवाज

तुझ्या आजीसाठी

चाल : इंद्रायणी काठी

तुझ्या आजीसाठी, आणली ही काठी
आता तरी मिठी, मार मला

जेवणात ही कढी अशीच राहुदे

चाल : जीवनात ही घडी अशीच राहुदे

जेवणात ही कढी अशीच राहूदे
भाजीच्या वाटीतही कढीच वाढू दे

तू चष्मा सांभाळ

चाल: फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार

गळक्या नाकावरती आहे चष्मा तो नाठाळ
गाढवा तू चष्मा सांभाळ

हाती तुझीया स्र्माल नाही
पदर कुणाचा जवळही नाही
नाक सारखे गळतच राही
घे स्र्माल अन नाक तुझे रे पूस आता तू बाळ
तू चष्मा सांभाळ, गाढवा तू चष्मा सांभाळ

तू तेंव्हा जोशी

चाल: तू तेंव्हा तशी

तू तेंव्हा जोशी
तू आत्ता जोशी
तू खरी आहेस जोशांची

एक चहा साधा
मला नाही दिला
तू पक्की आहेस पुण्याची
तू तेंव्हा जोशी
तू आत्ता जोशी

साडी तुझी जुनी चोळी तुझी जुनी
तुला नाही ओढ नव्याची
तू तेंव्हा जोशी
तू आत्ता जोशी

शतदा प्रेम करावे

चाल: या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

या चिवड्यावर, या भेळीवर
शतदा प्रेम करावे

रगडा पुरी, पाणी पुरी
इच्छा झाली पूरी
दाबेलीच्या पावामधुनी
फिरते माझी सुरी
पुरी टम्मशी बघुन कुणाचे
फुगरे गाल स्मरावे

पाने

Subscribe to विनोदी