इतका का छळ सखे

इतका का छळ सखे
कुठले हे बळ सखे

तुझिया जाण्यामुळे
हृदयावर वळ सखे

तृषलेली मी धरा
हलके कोसळ सखे

गहिर्‍या प्रेमात ही
कसली खळखळ सखे

तुजसाठी सोसतो
कितवी ही कळ सखे?

अजुनी गाठायचा
प्रणयाचा तळ सखे

घन माझे दाटता
भिजुनी तू जळ सखे

Average: 6.6 (13 votes)