हृदयात या रुजले ऋतू

प्रसाद शिरगांवकर

हृदयात या रुजले ऋतू
देहात या फुलले ऋतू

ही पालवी आली नवी
हे अंतरी सजले ऋतू

सांभाळ माझे श्वास हे
श्वासात मी जपले ऋतू

ये साजणे आता तरी
देहात या थकले ऋतू

गावू कसे गाणे नवे
थकुनी अता निजले ऋतू

Average: 8.3 (43 votes)