जगण्याची सोपीशी बाराखडी!

सुख, संपत्ती, सेक्स, संतती, संसार
अशा ‘स’ च्या बाराखडीत अडकलेलं आयुष्य
आनंद, एेश्वर्य, आरोग्य, आधार, आदान-प्रदान
अशा ‘अ’ च्या बाराखडीत आणुन जगू शकणं
हेच असावं खरं निर्वाण, खरा योग किंवा
खरंखुरं Art of Living!

हे जमतं, त्यंाना जमतं
बाकीचे मारत रहातात कोलांट्या उड्या
किंवा घेत रहातात गटांगळ्या
‘अजाणते’तल्या ‘अ' पासून ते ‘ज्ञान-भासा’तल्या ‘ज्ञ’ पर्यंतच्या
सगळ्याच मूळाक्षरांमध्ये

मुळात ज्ञानातल्या ‘ज्ञ’ पर्यंत पोचण्यासाठी जे
आनंदातला ‘अ’ आत्मसात करू शकतात
त्यांनाच जमते
सुंदर आयुष्य जगण्याची सोपीशी बाराखडी!

अद्याप एकही मत नाही