चोरायण

चाल:
स्वये श्री रामप्रभु ऐकती
कुशलव रामायण गाती

स्वये श्री डॉन प्रभु ऐकती
मंत्रिगण चोरायण गाती

आहेत दोघे एक कुळाचे
सजीव पुतळे चोरपणाचे
चेले गाती चरित बॉसचे
मृत्यूने काळाची आरती
मंत्रिगण चोरायण गाती

दुबईस्र्पी स्वर्गामधुनी
बॉसच आले खु उतस्र्नी
मंत्रिवरांची ऐकुन गाणी
नटनट्या जोषाने नाचती
मंत्रिगण चोरायण गाती

वृत्त तयांचे सगळे वाचुन
चोरपणाही सगळा पाहुन
मंत्री पुन्हा ते येती निवडुन
हे कसे कोणा नच माहिती
मंत्रिगण चोरायण गाती

स्वये श्री डॉन प्रभु ऐकती
मंत्रिगण चोरायण गाती

Average: 8.7 (16 votes)