हरि मुखे म्हणा (रॅप!)

(हे गीत रॅप-गीताच्या चालीत म्हणून पहावे!)

हरि मुखे म्हणा तुम्ही हरि मुखे म्हणा
हरि मुखे म्हणा तुम्ही हरि मुखे म्हणा

भारनियमनामुळे घरी वीज नाही
टीव्ही नाही, पंखा नाही, चालू फ्रीज नाही
अंधारात देवाजीचे नाव गुणगुणा
हरि मुखे म्हणा तुम्ही हरि मुखे म्हणा

रोज भाव वाढे इथे रोज भाव वाढे
चहा मीठ साखरेचा रोज भाव वाढे
जीवनात आमच्या का रोज वंचना
हरि मुखे म्हणा तुम्ही हरि मुखे म्हणा

संसदेत चालतसे सावळा गोंधळ
कारभार देशाचा या ओंगळ बोंगळ
हरिनेच तारावे ही करू प्रार्थना
हरि मुखे म्हणा तुम्ही हरि मुखे म्हणा

Average: 6.1 (32 votes)