सामाजिक

सामाजिक

शंकऱ्याच्या गुरुजींची गोष्ट

'आपला नंबर कदी लागनार बा?' छोट्या चंद्यानं त्याच्या बापाचा, शंकऱ्याचा सदरा ओढत त्याला विचारलं.

'गप उबा ऱ्हा की, येवढी गर्दी दिसत नाय का तुला', शंकऱ्या त्याचा हात झटकत त्याच्यावर डाफरला. मनातल्या मनात आज चंद्याला का घेऊन आलो याचा विचार करत स्वतःवरच चिडला.

Average: 10 (2 votes)

सिक्युरिटी

रेवा "साला कुत्रा हरामी लोचट" त्या सिक्युरिटी वाल्याला मनातल्या मनात सणसणीत शिव्या हासडून रेवा कंपनीत शिरली. रोजच्यासारखीच. तशी ती नवीनच होती या कंपनीत. दोनेक महिनेच झाले असतील जॉईन होऊन. पण अजून पर्मनंट नसल्यानं रोज सिक्युरिटी केबिन मध्ये जाऊन पास घ्यावा लागायचा तिला. आणि रोज तोच तो सिक्युरिटीवाला तेच ते प्रश्न विचारायचा पास द्यायच्या आधी. ते प्रश्न ठीक होते. नाव-गाव-पत्ता टाईप. पण ते विचारतानाचा त्याचा टोन. आणि मुख्य म्हणजे त्याची ती लुब्री नजर. आरपार भेदून जायची रेवाला. अक्षरश: कपडे भेदून आत शिरायची. आपण नागडे आहोत असं वाटायचं रेवाला रोज कंपनीत शिरताना.
Average: 7.7 (3 votes)

गजरे

सिग्नलला गाडी उभी असताना
काचेपाशी गजरेवाला येतो
शेजारी 'मॅडम' आहेत बघुन
उगाच तिथे घुटमळतो
मी बायकोकडे बघतो
ती गजऱ्य़ांकडे बघत असते

Average: 4.7 (9 votes)

कोण खरे श्रीमंत?

मी नेहमीच्या दुकानात जातो, नेहमीचं वाणसामान घेतो
मी, 'किती झाले?' दुकानदार, '४७०'
मी ५०० ची नोट देतो। तो उरलेले पैसे परत देतो
मी न बघताच खिशात टाकतो

Average: 6.3 (9 votes)

शे दोनशेचा रुमाल

मी रुमाल विकत घेतो
माझ्या नेहमीच्या मॉलमधून
मुळात तो असतो कापूस
दूरवरच्या कुठल्या शेताततला

Average: 8 (2 votes)

सिटी टुरिझम

प्राण्यांच्या काही टोळ्यांमध्ये
‘सिटी टुरिझम’ करण्याचं नवं फॅड आलंय!

येतात सिटी टुरिझम साठी
घोळकेच्या घोळके माकडांचे
बघतात टकामका
माणसं, रस्ते, बिल्डिंगा, वाहनं वगैरे
येतात दणादण झाडा-छपरांवर उड्या मारत
जातात कधी आपण होऊन, कधी हाकलल्या नंतर

Average: 7.5 (2 votes)

ग्लोबल घसा!

सकाळी उठल्या उठल्या
आसामातून आलेली चहा पावडर,
भिलवडी किंवा आणंद मधून आलेलं दूध,
भीमा-पाटस किंवा सांगलीतून आलेली साखर,
पानशेत-खडकवासल्यातून आलेल्या पाण्यात मिसळायची
आणि आखातातून-इराणमधून आलेल्या गॅसवर उकळून
त्याचा फक्कड चहा करुन प्यायचा

Average: 8.3 (8 votes)

माणूस तसा प्रचंड कर्तुत्ववान प्राणी

माणूस तसा प्रचंड कर्तुत्ववान प्राणी
इतर प्राण्यांच्या तूलनेत
विशेष शारिरिक क्षमता नसतानाही
त्यानं जमीन व्यापली, समुद्र ओलांडले
आकाशाला गवसण्या घातल्या
अवकाशातही झेप घेतली

Average: 7 (1 vote)

मी त्यांना सांगत होतो

मी त्यांना सांगत होतो
दोन अधिक दोन चार...
पाण्याला रंग नसतो...
साप हा सरपटणारा प्राणी...
इत्यादी साधं सोपं गणित, शास्त्र वगैरे

Average: 8.6 (7 votes)

जेंव्हा मी मांडलं माझ्या लाडक्या देशाचं भवितव्य

जेंव्हा मी मांडलं माझ्या लाडक्या देशाचं भवितव्य
तरल, गहिऱ्या शब्दांतल्या कवितांमध्ये
लोक म्हणाले, कोण हा बावळट कवी?
काय लिहितोय हे टपराट…..

Average: 7 (1 vote)