अध्यात्मिक

अध्यात्मिक

सावर तू...

झगमगणारे अंबर तू
दरवळणारे अत्तर तू

ओठांवरला प्रश्न कधी
हृदयामधले उत्तर तू

खळाळणारा तूच झरा
उधाणवेडा सागर तू

तूच नभीचे इंद्रधनू
लखलखणारा भास्कर तू

जीव गुंफला तुझ्या गळा
मम जीवाला सावर तू!

Average: 6 (3 votes)