गूढचलनांचं भविष्य काय?

प्रसाद शिरगांवकर

व्यवहार हा मानवी जीवनाचा स्थायिभाव आहे. दहा हजार वर्षांपूर्वी शेतीमध्ये आलेला माणूस, “माझ्या शेतातली थोडी ज्वारी तुला घे आणि बदल्यात तुझ्याकडचा थोडा तांदूळ मला दे” म्हणून व्यवहार करायला लागला. एकमेकांवर आणि व्यवहारांवर अवलंबून असलेलं आयुष्य जगायला लागला. मग कधीतरी वस्तूविनिमय करण्याऐवजी कोण्या राजानं छापलेली सोन्या-चांदीची नाणी व्यवहारासाठी वापरायला लागला. अन मग पुढे सोन्या-चांदीच्या नाण्यांऐवजी सरकारी सहीचे कागदाचे तुकडेही वापरायला लागला, वापरतो आहे अजूनही. अगदी अलिकडच्या डिजिटल युगात, कागदाच्या तुकड्यांऐवजी व्हर्चुअल पैसाही आला. मग हातातलं कार्ड स्वाईप करून किंवा मोबाईलवरचं ऍप वापरुन पैसा किंवा ‘मूल्य’ इकडून तिकडे पाठवून व्यवहार करणं सुरु झालंय. तरीही हे मूल्य, हा पैसा स्थानिक सरकानं अधिकृत मानलेला आणि नियंत्रण ठेवलेला असतो आजही. 

पैसा आणि व्यवहारांच्या ह्या सरकारी, अधिकृत आणि नियंत्रित पद्धतीला पूर्णपणे छेद देऊन संपूर्णतं विकेंद्रित, कोणाच्याही मालकीची नसलेली आणि संपूर्ण मानवी समुदायाचं नियंत्रण असलेली चलनपद्धत आणि व्यवहार व्यवस्था म्हणजे गूढचलनं… 

ही उपयुक्त आहे का आणि टिकेल का हे आज माहित नाही….

कारण आपणच सगळे हे ठरवणार आहोत! 

Average: 8 (1 vote)