तुला मी सांगतो राणी

प्रसाद शिरगांवकर

तुला मी सांगतो राणी, असे वागू नये
फुका आयुष्य कोणाचे असे मागू नये!

जरी चंद्रासवे ती रात सारी जागते
मला ती सांगते आहे 'सख्या जागू नये!'

गणीते आज प्रेमाची सखे मांडू नवी
गुणावे रोज प्रेमाला, कधी भागू नये!

पुरेसे घेतले जाते, दिले थोडे जरी
(जगाचा कायदा हा ही तुला लागू नये!)

अता अंतीम ही इच्छा तुझ्या दारातली
पुराणी तोफ यारांनी पुन्हा डागू नये...

Average: 5.7 (14 votes)