सखये तू राहतेस दूर किती

प्रसाद शिरगांवकर

सखये तू राहतेस दूर किती...
इकडे मी पोहतोय पूर किती...

सगळे दिधले तुलाच अंतरंग
उसने आणू अजून नूर किती?

म्हणतो मी कालचेच गीत अता
हुडकू मी रोज रोज सूर किती...

हलके होतास येत रोज तरी
उठले हे अंग़णात खूर किती!

सलतो काटा कुणास, फूल कुणा
कळले प्रेमात कोण चूर किती!

वणवा पाहून शांत गाव पुरे
बडवू मी एकटाच ऊर किती...

Average: 8.4 (17 votes)