प्रसाद शिरगांवकर

किती कितीदा समुद्र व्हावे सखीमुळे
किती कितीदा उधाण यावे सखीमुळे

तशी न माझी मुळे कधी रोवली कुठे
तृषार्त आत्मा उनाड धावे सखीमुळे

तिच्याविना ना घरात माझ्या झुळुकही
समग्र जीवन सुगंध व्हावे सखीमुळे

सदैव देवो मला सुरांचे दान सखी
प्रीत बहरले गीत सुचावे सखीमुळे

ढकलत होतो श्वास एकटा कसातरी
क्षितीज आता मला खुणावे सखीमुळे

Average: 7.5 (6 votes)