रक्तात साकळूया

प्रसाद शिरगांवकर

आता असे जळूया
विश्वात दर्वळूया

पेटून आज दोघे
प्रेमात पाघळूया

पाउस होवुनिया
बेहोष कोसळूया

स्वप्नातल्या सुखांना
सत्यात आवळूया

आलिंगनात आता
बेभान उन्मळूया

गुंफून एकमेकां
रक्तात साकळूया

Average: 8.7 (15 votes)