प्रिन्स आणि आपण...

प्रसाद शिरगांवकर

पाच वर्षांचा प्रिन्स
साठ फुटी खड्ड्यात
पन्नास तास अडकला...
तर
म्याडमपासून, मनमोहनांपर्यंत
लष्करापासून, मंत्र्या संत्र्यांपर्यंत
सगळ्या सगळ्यांनी पळापळ केली...
नाही,
वाहिन्यांनी त्यांना करायला लावली...
पण
कोट्यावधींचा देश
खोल खोल खड्ड्यात
साठवर्ष अडकून आहे
यावर कुठे किरकोळ चर्चाही नाही...
कारण
प्रिन्सला लाभलेलं TRP चं वरदान
तुमच्या आमच्या खड्ड्यांना नाही...
म्हणून
TRP चा विजय असो...
आणि वाहिनीशाहीचाही विजय असो...

Average: 7.6 (72 votes)