हे शिवनंदन, करितो वंदन

प्रसाद शिरगांवकर

हे शिवनंदन, करितो वंदन
विघ्नांचे करुनी निर्दालन
सुख शांती दे अम्हा चिरंतन

गगनी भरल्या रंगांमधुनी
अन फुललेल्या कुसुमांमधुनी
तव रूपाचे होते दर्शन
हे शिवनंदन, करितो वंदन

कोसळणार्याह धारांमधुनी
सळसळणार्याह वार्याधमधुनी
तव सूरांचे होते गुंजन
हे शिवनंदन, करितो वंदन

श्वासांमधुनी तुला पूजितो
देहाचे या फूल अर्पितो
स्पंदांतुनही तुझेच कीर्तन
हे शिवनंदन, करितो वंदन
विघ्नांचे करुनी निर्दालन
सुख शांती दे अम्हा चिरंतन

Average: 7.7 (40 votes)