हे गजवदना

प्रसाद शिरगांवकर

हे गजवदना, हे गजवदना
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना

तू करुणेचा विशाल सागर
तू तेजाने भरले अंबर
तुच अग्नि, तू वायु, धरा अन
चराचरांतून तुझी चेतना

मूर्तरूप तू चैतन्याचे
धाम अकल्पित कैवल्याचे
श्वासांमधुनि, स्पंदांमधुनि
होत रहावी तुझी प्रार्थना

आनंदाचे गांव सदोदित
तुझ्या कृपेने हृदयी निर्मित
आनंदाच्या गावकर्‍यांची
श्री गणराया तुला वंदना

Average: 5 (51 votes)