भास आहे सर्वकाही...

प्रसाद शिरगांवकर

भास आहे सर्वकाही...
जीवनाला अर्थ नाही

तो म्हणे सर्वत्र आहे
(भेट नाही एकदाही...)

शब्द सारे फोल होते
शांतता पण अर्थवाही...

पाठ फिरता पावसाची
मेघ उरले खिन्न काही

शेवटी येतो स्वतःशी
मी दिशा हिंडून दाही

जाणिवा का गोठलेल्या?
सत्य तर आहे प्रवाही!

Average: 8.3 (24 votes)