प्रसाद शिरगांवकर

रक्त माझे आटले, आता पुरे
श्वास माझे थांबले, आता पुरे

ओढतो आहेस का चाबूक तू
चाबकाला लागले, आता पुरे!

वेदनांची पालखी ओढून ही
पाय माझे श्रांतले, आता पुरे...

सांगण्या जाता कुणा माझ्या व्यथा
लोक सांगू लागले 'आता पुरे'

रंगवीतो चित्र विश्वाचे नवे
वेदनांचे कुंचले आता पुरे!

Average: 8.3 (15 votes)