प्रसाद शिरगांवकर

स्पंदनांचा आज माझ्या आसरा हो
तू सखे बागेत माझ्या मोगरा हो

शोधतो मी माझिया रूपास राणी
दर्पणी जो पाहतो तो चेहरा हो

धृपदाला आळवू आता किती मी
ये सखे तू जीवनाचा अंतरा हो

वाहुनी जाती जरी सारीच स्वप्ने
भंगला नाही कधी तू तो चिरा हो

पाकळ्या माझ्या तुझ्यासाठीच सार्‍या
गंध माझा चाखणारा भोवरा हो

Average: 7.8 (6 votes)