आली आली तारा

प्रसाद शिरगांवकर

चाल : आला आला वारा

आली आली तारा
तिच्या हातामंदी झारा
झोडपणी करावया
आली तरातरा...
तारा आली तरातरा

आजवरी मला किती चोपलं चोपलं
लाटण्यानं जरी किती ठोकलं ठोकलं
बदल नाही म्हणून आली घेउन ती झारा...

आली आली तारा
तिच्या हातामंदी झारा

नव्या झार्‍याचं बाई लकाकतं पातं
लागलं गं मला, अता आवर तू हात
येई माझ्या पापणीत आसवांचा झरा...

आली आली तारा
तिच्या हातामंदी झारा
झोडपणी करावया
आली तरातरा।।।
तारा आली तरातरा

Average: 8.2 (25 votes)