अखंड मैफल

प्रसाद शिरगांवकर

तुला पाहता षड्ज छेडतो
रिषभ स्पर्शण्यासाठी
तुझी मिठी गंधार होतसे
मध्यमा तुझ्या ओठी

पंचमातली एकरूपता
श्रांत धैवतासाठी
निषाधातली आर्त पूर्तता
अपूर्ण षड्जासाठी

कोमल सारे सूर तुझे अन
तीव्रच माझ्या ओठी
सात सुरांची अखंड मैफल
तुझ्या नि माझ्यासाठी!

Average: 7.2 (25 votes)