माझ्या विषयी थोडंसं...

Prasad Shirgaonkarखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही! तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो!

  • शिक्षणाने कॉस्ट अकाउंटंट, व्यवसायाने तंत्रज्ञ आणि हृदयाने कवी!
  • जन्मगांव पुणे... नोकरी / व्यवसायाच्या निमित्त बारा देशांमधल्या पंचवीसेक महानगरांमध्ये प्रवास व वास्तव्य
  • लंडन मधे रहात असताना तेथील महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीमधे सक्रीय सहभाग... एक वर्ष उपाध्यक्ष आणि एक वर्ष अध्यक्ष पदाची जबाबदारी...
  • काव्य, कथा आणि ललित लेखनामध्ये विशेष रूची... गेली अनेक वर्षे मायबोली.कॉम, मनोगत.कॉम आणि फेसबुकवर नियमित लिखाण. साधं सोपं डॉट कॉम ही स्वतःची कवितांची वेबसाईट २००६ मध्ये प्रकाशित. या वेबसाईटला आजवर दोन लाखाहून अधिक वाचकांची भेट!
  • ‘प्रासादिक’ ह्या संपूर्णपणे एका माणसानं लिहिलेल्या मोबाईल दिवाळी अंकाचं २०१५ पासून सलग चार वर्षं लेखन-संपादन
  • ‘i-बाप’ हा आधुनिक काळातील वडील व मुलगा यांच्या नात्यावरचा स्फुटलेख वजा कविता संग्रह प्रकाशित
  • ‘फोटोशाळा’ नावाच्या मराठी मधून फोटोग्राफीचं प्रशिक्षण देणाऱ्या वेब-चॅनलचा निर्माता.
  • अनेक वर्तमानपत्रांमध्ये तंत्रज्ञान विषयक लेखांचं नियमित लेखन.
  • सुजाण आणि सजग पालकत्व या विषयावरच्या YouTube वर गाजलेल्या चार लघुपटांचा (Shortfilms) लेखक-दिग्दर्शक.
  • 'आनंदाचं गांव'हा स्वनिर्मित कविता, गझलांचा कार्यक्रम... ज्याचे 2002 पासून पुणे, मुंबई व लंडनसह अनेक शहरांमध्ये अनेक प्रयोग संपन्न...

बस... या पलिकडे जे सांगावंसं वाटतं ते सगळं माझ्या लिखाणात आहेच! हे सर्व वाचल्यावर माझ्याशी संपर्क साधायची इच्छा राहिलीच असेल तर येथून साधू शकाल - प्रसाद शिरगांवकर