हास्यकविता

बायको नावाचं वादळ

तुम्ही घरात शिरता तेंव्हा
सारं शांत शांत असतं
चपला जागेवर, पेपर टिपॉयवर
सारं जागच्या जागी असतं
सोफ्यावरती बसून राहून
हातामधे रिमोट घेऊन
बायको नावाचं वादळ
तुमची वाट बघत बसलं असतं!

लोखंडाचे टक्कल!

सुपीक कोणा डोक्यामधली
सुपीकशी ही शक्कल
हरेक माथ्यावरती चढले
लोखंडाचे टक्कल!

घरामधे तू ससा

सिंह जरी तू जगतासाठी
घरामधे तू ससा
हीच कहाणी तुझी मानवा
हाय असा तू कसा!

तुझ्या आरोळ्या डरकाळ्यांनी
दुमदुमते तारांगण
तुझी कर्तबे पाहुन होते
अचंबित तारांगण
घरात येता कशास होतो
तुझा कोरडा घसा!!
हीच कहाणी तुझी मानवा
हाय असा तू कसा!

पसारा... पसारा...

कसा आज काव्यास यावा फुलोरा
सखे भोवताली, पसारा... पसारा...!

इथे ढीग आहे, तिथे ढीग आहे
जिथे पाहतो मी तिथे ढीग आहे
ढिगारे बघोनी मनाला शहारा
सखे भोवताली, पसारा... पसारा...

कोण म्हणतं आमच्या घरात

कोण म्हणतं आमच्या घरात
माझं काही चालत नाही?
गरम पाणी मिळाल्याशिवाय
मी भांड्यांना हात लावत नाही!

दुपार

तुडुंब जेवण झाल्यावरती
ग्लानी यावी अपार
निवांत लोळत गादीवरती
जावी पुरी दुपार!

बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1

माझ्या हास्य कविता, विनोदी कविता, हजला आणि हलक्या फुलक्या कवितांचा संग्रह...

पाने

Subscribe to हास्यकविता