राजकीय

कणा (अतिरेक्याचा)


| |

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

एकूण गुणांकन
गुण: 9.5, मिळालेली मते: 251

सेना... ब्रिगेड...


| |

चला उठा बंधुंनो आपण
घटना* आता गाढुन टाकू
आप-आपली सेना अथवा
ब्रिगेड आता आपण स्थापू

'घटने'ची ही मुजोर चौकट
तुम्हा अम्हाला हवी कशाला
जसे मानतो तसेच वागू
बघू रोखतो कोण आम्हाला
खुळे कायदे, भली व्यवस्था
मिळून आता मोडुन टाकू
आप-आपली सेना अथवा
ब्रिगेड आता आपण स्थापू

एकूण गुणांकन
गुण: 8.6, मिळालेली मते: 16

आमच्या भूभू ची पोस्टर्स!


| |

परवाच आमच्या भूभूला
काही राजकारणी लोक चावून गेले
अन त्याच्या वाढदिवसाची पोस्टर्स
चौका-चौकात लावून गेले!

'धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं'
म्हणून भूभूला आम्ही धरत नाही
अन दिवसभर भुंकणं सोडून
भूभू दुसरं काही करत नाही!

एकूण गुणांकन
गुण: 8.1, मिळालेली मते: 104
Syndicate content