अध्यात्मिक

हे शिवनंदन, करितो वंदन


| |

हे शिवनंदन, करितो वंदन
विघ्नांचे करुनी निर्दालन
सुख शांती दे अम्हा चिरंतन

गगनी भरल्या रंगांमधुनी
अन फुललेल्या कुसुमांमधुनी
तव रूपाचे होते दर्शन
हे शिवनंदन, करितो वंदन

कोसळणार्याह धारांमधुनी
सळसळणार्याह वार्याधमधुनी

एकूण गुणांकन
गुण: 6.8, मिळालेली मते: 13

गणपतीचे बडबड गीत


| |

(चाल: आओ बच्चो तुम्हे दिखाये झांकी हिंदुस्तानकी!)

गणपती बाप्पा माझ्यासाठी
एवढं तरी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

मनिमाउचे मौ मौ शेपुट
चिवचिवणे चिउताईचे
माकडदादाचे ते हुपहुप
गुरगुरणे वाघोबाचे
मला सांग तू या मित्रांशी
दोस्ती माझी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

एकूण गुणांकन
गुण: 6.7, मिळालेली मते: 60

हे गजवदना


| |

हे गजवदना, हे गजवदना
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना

तू करुणेचा विशाल सागर
तू तेजाने भरले अंबर
तुच अग्नि, तू वायु, धरा अन
चराचरांतून तुझी चेतना

एकूण गुणांकन
गुण: 4.1, मिळालेली मते: 39

पैलतीर...


| |

'सदैव माझ्या घरीच राहील'
कशास आशा धरू
उडून जाईल पैलतीरावर
कधीतरी पाखरू

असे हिवाळे, तसे उन्हाळे
तऱ्हा ऋतुंच्या किती
मावळणाऱ्या दिवसामाजी
जराजराशी क्षती
व्यर्थ धावत्या ऋतुचक्राची
कास कशाला धरू
उडून जाईल पैलतीरावर
कधीतरी पाखरू

एकूण गुणांकन
गुण: 8.7, मिळालेली मते: 6

रे गजानना


| |

प्रार्थनेस आमच्या पाव रे गजानना
लेकरांस भेटण्या धाव रे गजानना

या विराट सागरी नाव आमची असे
दाटले तुफान अन सोबती कुणी नसे
सावरावयास ये नाव रे गजानना
लेकरांस भेटण्या धाव रे गजानना

एकूण गुणांकन
गुण: 5.5, मिळालेली मते: 2

आज ना उद्या...


| |

बीज लावले, रुजेल आज ना उद्या
वृक्ष गोजिरा झुलेल आज ना उद्या

एवढ्यात आवरू नकोस पाकळ्या
गंध अंगणी भरेल आज ना उद्या

एकूण गुणांकन
गुण: 8.7, मिळालेली मते: 7

सारे तुझेच होते


| |

माझे म्हणू जयाला, सारे तुझेच होते
तारे तुझेच होते... वारे तुझेच होते!

जे वाहतो तयाला ओझे कसे म्हणू मी
पाठीवरी फुलांचे भारे तुझेच होते

एकूण गुणांकन
गुण: 8.3, मिळालेली मते: 11

असेलही... नसेलही...


| |

जीवनात चंद्रमा असेलही... नसेलही...
काळजात पौर्णिमा असेलही... नसेलही...

भाग्यदा ललाटरेख शोधली कितीकदा
यापुढे तिची तमा असेलही... नसेलही...

एकूण गुणांकन
गुण: 9.1, मिळालेली मते: 8

अपार


| |

मी तुलाच पूजले अपार
दुःख तू मला दिले अपार

एकही न गंध जीवनी
ऐकतो तुझी फुले अपार

स्वर्गलोक गाठण्या तुझा
हाय, हाल सोसले अपार

आज गाल कोरडे जरी
तोय काल वाहिले अपार

जा नको तुझे तसू मला
सागरात शिंपले अपार

एकूण गुणांकन
गुण: 7.4, मिळालेली मते: 8

मर्म


| |

ठोकरूया धर्म सारे
या, करूया कर्म सारे

स्वर्ग हा कर्मात आहे
जाणुया हे मर्म सारे

कामना खोट्या सुखाची
हेच आहे वर्म सारे

सोडता मी यत्न माझे
देव होती नर्म सारे!

कर्म माझा अंतरात्मा
देह आहे चर्म सारे...

एकूण गुणांकन
गुण: 2.9, मिळालेली मते: 10
Syndicate content