प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले


| |

प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले
प्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले

बाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे
प्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले

दु:खामधेच मिळते संधी पराक्रमाची, आयुष्य जिंकण्याची
जाणून घे तुझ्या तू हृदयी विवंचनांचे भांडार साचलेले

पेरून बीज येथे सोडून देश माझा गोरे निघून गेले
आता सभोवताली दिसतात सर्व काळे साहेब माजलेले

डोळ्यांत स्वप्न आहे, हातात हात आणिक हृदयी दिशा निराळ्या
गंमत अशी तरीही येथे सुखात सारे संसार चाललेले

संपून प्राण गेले जगतो तरी सखे मी आणून श्वास उसने
देतेस हात हाती इतक्याच तारणावर आयुष्य चाललेले

एकूण गुणांकन
+++++++---
गुण: 7.6, मिळालेली मते: 38
Votes
कृपया या पानाचे गुणांकन करावे. 1 - कमितकमी गुण, 10 - सर्वाधिक गुण

मि साध

मि साध सोप्प छ नेह्मेएछ वातसरु आहे, एकुन सहित्य खोओपछ छन आहे, मेए बरेछ wएल आप्ल्य कवित चोप्य पस्ते करोओन मzय मित्रान पथwअतो, पन त्य बरोबर प्रसाद नाव तकोओन तुमछि सिते पहन्यस अथ्wअनिने सन्ग्तो! ंओग्र fउलला हेए सिते पन छन आहे